Dhule: धुळे येथे पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या

धुळे येथील एका 57 वर्षीय पोलीस हवालदारने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धुळे जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी त्याने हे कृत्य केले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. ही घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पोहबारा येथे घडली.

Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

धुळे येथील एका 57 वर्षीय पोलीस हवालदारने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धुळे जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी त्याने हे कृत्य केले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. ही घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पोहबारा येथे घडली. काळूराम चैत्राम असे हवालदाराचे नाव आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, अहिरे यांना सुरक्षेसाठी मुंबईतील मंत्रालय, राज्य सचिवालयात तैनात करण्यात आले होते. ते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मूळ गावी होते. अत्राम यांचा मृतदेह त्याच्या राहत्या घराच्या आवारात असलेल्या गोठ्यात लटकलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now