Ahmednagar: खेळत असताना पाच वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला, एनडीआरएफच्या पाच टीमने बचाव कार्य केले सुरू
कर्जत तहसील अंतर्गत कोपर्डी गावातील बोअरवेलमधून बालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पाच पथकाने बचाव कार्य सुरु केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात सोमवारी संध्याकाळी एक पाच वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिका-यांनी ही माहिती दिली. कर्जत तहसील अंतर्गत कोपर्डी गावातील बोअरवेलमधून बालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पाच पथकाने बचाव कार्य सुरु केले आहे. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मुलगा बोअरवेलमध्ये पडला. ते म्हणाले की, मूल 15 फूट खोलवर अडकले आहे. बचावकार्य सुरू असून घटनास्थळी रुग्णवाहिका आणि इतर वैद्यकीय मदत सज्ज ठेवण्यात आली आहे. बोअरवेलमध्ये पडलेला मुलगा हा ऊसतोड मजुराचा मुलगा असून, खेळत असताना तो बंद बोअरवेलमध्ये पडला असावा, असे पोलिसांनी सांगितले.
पहा व्हिडिओ