Mumbai: नवविर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे नवविर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर यांच्याविरोधात वनराई पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Ravindra Waikar PC ANI

Mumbai: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे (Shivsena) नवविर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर यांच्याविरोधात वनराई पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात पंडिलकर यांनी मोबाईल फोन ठेवला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत उत्तर पश्चिममधील भारत जन आधार पक्षाचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहान यांनी नेस्को येथील मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापरल्याचा आरोपाखाली एका व्यक्तीविरुध्द वनराई पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर काही दिवसांनी ही पोलिस कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा- मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांकडून रविंद्र वायकरांचा अवघ्या 681 मतांनी पराभव)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)