Mumbai: विहिरीत पोहताना विजेचा धक्का लागून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल
विहिरीत मुलाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. हॉटेलसाठी पाणी काढण्यासाठी गेला होता.
Mumbai: चेंबूरमध्ये माहुल परिसरात विहिरीत पोहताना एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. विहिरीत मुलाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. हॉटेलच्या कामासाठी पाणी काढण्यासाठी विहिरीत गेला होता. विहिरीत बेकायदेशीररीत्या मोटार लावली होती. या मोटारच्या विजेचा धक्का लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अनंत माहुलकर, दयाराम माहुलकर आणि हरिराम माहुलकर या हॉटेल मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (हेही वाचा- उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेले वाहन बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत पडले)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)