संभाजीनगरमध्ये Lubrizol उभारणार 2000 कोटींचा प्रकल्प; तब्बल 900 जणांना मिळणार रोजगार

यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीस हातभार लागेल.

Lubrizol India Private Limited

Lubrizol India Private Limited: लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) या ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक वंगणासाठीच्या मिश्रीत प्रणाली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीद्वारे, छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन औद्योगिक क्षेत्रात आधुनिक वंगण आणि इंधन मिश्रीत उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच 900 जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. उद्योग विभाग आणि लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आज मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते बिडकीन परिसरातील 120 एकर जागेचे वाटप पत्र लुब्रिझोल कंपनीस सुपूर्द करण्यात आले.

मंत्री सामंत म्हणाले की, लुब्रिझोल समूहाने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत आपली गुंतवणूक वाढवण्याची आणि उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीस हातभार लागेल. त्याचबरोबर रोजगार देखील निर्माण होतील. उद्योग विभाग कंपनीला पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ऑरिक बिडकीन येथे नवीन सिंथेटिक ऑर्गेनिक रासायनिक उत्पादन सुविधा स्थापन करणार आहे. (हेही वाचा: Unemployment in India: भारतात 2022-23 मध्ये शहरी बेरोजगारी 5.4% वर; गोवा आणि केरळमध्ये सर्वाधिक, सरकारची संसदेत माहिती)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)