मुली एकट्यात इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतात, जाणून घ्या , Google चा अहवाल आला समोर, काय सर्च करतात ते जाणून बसेल धक्का

मग महिला इंटरनेटवर नेमका काय अधिक सर्च करतात या बाबत उत्सुकता असेलच, चला तर मग पाहूया

Kids with smartphones (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

गुगल हे सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. आपल्या मनात कोणताही प्रश्न आला तर त्याचे उत्तर आपण फक्त गुगलवरच शोधू शकतो. गुगलकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे असे म्हटले जाते. दरवर्षी गुगल सर्वाधिक सर्च केले जाणारे प्रश्न आणि माहिती प्रसिद्ध करतो. गेल्या वर्षी समोर आलेल्या अहवालात महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात त्याची माहिती समोर आली आहे. अहवालात असे म्हटले आहे की देशातील एकूण 150 दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांपैकी, भारतातील सुमारे 60 दशलक्ष महिला इंटरनेटचा वापर करतात. याशिवाय गुगलवर मुली काय शोधतात हे जाणून घेणे खूप रंजक आहे, कारण स्त्रियांचे मन कोणीच ओळखू शकत नाही असे म्हटले जाते. मग महिला इंटरनेटवर नेमका काय अधिक सर्च करतात या बाबत उत्सुकता असेलच, चला तर मग पाहूया महिला इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतात.   

मुली इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च, जाणून घ्या 

करिअर संबंधित माहिती

अहवालानुसार, मुली लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी असतात, त्या आपल्या करिअरला जास्तीत जास्त महत्त्व देतात. मुली इंटरनेटवर यासंबंधीची माहिती अधिक सर्च करतात. जसे त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे किंवा कोणत्या विषयात करिअर करायचे आहे.

ऑनलाइन शॉपिंगसंबंधी 

मुली ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर जाऊन कपड्यांचे डिझाईन, नवीन कलेक्शन, ऑफर्स याबद्दल इंटरनेटवर जास्त सर्च करतात. अनेक संशोधनांमध्ये ही बाब समोर आली आहे. मुलींना सुंदर आणि वेगळे दिसायला आवडते. यासाठी ते इंटरनेटची मदत घेतात. मुलींना फॅशन, ट्रेंड, ब्युटी ट्रीटमेंट आणि घरगुती उपाय शोधायला जास्त आवडतात.

मेहेंदी डिझाइन

मुलींना मेहेंदी हातावर मेहेंदी काढायला आवडते. हेही या संशोधनात समोर आले आहे. मुली अनेकदा गुगलवर मेंदीचे नवीन डिझाइन शोधतात.

रोमँटिक गाणे 

प्रत्येकाला संगीत ऐकायला आवडते. पण संगीत ही मुलींनी सर्वाधिक सर्च केलेल्या माहिती पैकी एक आहे. मुली इंटरनेटवर रोमँटिक गाणी शोधतात आणि ऐकतात. यासोबतच मुली इंटरनेटवर रोमँटिक कविताही शोधतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)