Dharohar Bharat Ki: दूरदर्शन वरील ‘धरोहर भारत की’ हा माहितीपट पाहण्याचे PM Narendra Modi यांचे नागरिकांना आवाहन

दूरदर्शनने केलेल्या एका ट्विटला प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले की, "आपलं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि शूर योद्धयांना याद्वारे श्रद्धांजली.

PM Narendra Modi (PC - ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 14 आणि 15 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता डीडी नॅशनल वरून दोन भागात प्रसारित केला जाणारा ‘धरोहर भारत की’ हा माहितीपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. दूरदर्शनने केलेल्या एका ट्विटला प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले की, "आपलं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि शूर योद्धयांना याद्वारे श्रद्धांजली. दूरदर्शन राष्ट्रीय DDNational वर येत्या 14 आणि 15 तारखेला रात्री आठ वाजता 'धरोहर भारत की' हा दोन भागांचा माहितीपट जरूर पहा.” (हेही वाचा: India's First Underwater Metro: कोलकाता मेट्रोने रचला इतिहास; भारतात पहिल्यांदाच नदीखालून धावली मेट्रो रेल्वे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now