Best Tourism Villages Competition-2024: केंद्र सरकारकडून देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गावांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील कर्दे गावाचा समावेश (Full List)

दुसऱ्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धेत, 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून एकूण 991 अर्ज प्राप्त झाले होते.

कर्दे गाव

Winners of Best Tourism Villages Competition-2024: भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने आज 27 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा 2024 च्या विजेत्यांची घोषणा केली. भारताचा आत्मा म्हणजेच देशातल्या गावांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा सुरू करण्यात आली. सर्व पैलूंवर समुदाय-आधारित मूल्ये आणि शाश्वततेसाठी बांधिलकीद्वारे सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या गावांचा धांडोळा घेऊन त्यांची निवड करण्यावर यात भर देण्यात आला.

वर्ष 2023 मध्ये झालेल्या पहिल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धेत 795 गावांमधून अर्ज आले. दुसऱ्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धेत, 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून एकूण 991 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 36 गावांची निवड सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 च्या 8 श्रेणींमध्ये विजेते म्हणून करण्यात आली. विजेत्या गावात कृषी पर्यटन श्रेणीत महाराष्ट्रातील कर्दे गावाचा समावेश आहे. (हेही वाचा; Tourist Accommodation: वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बाब; सुरु होणार पर्यटक निवास, मिळणार तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा)

हे 36 विजेते खालीलप्रमाणे आहेत-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif