Porn and Men Health Issues: सावधान, पोर्न पाहण्याच्या अतिरेकाचा आरोग्यावर होतोय मोठा दुष्परीणाम- अहवाल

जो अधिक चिंताजनक असल्याचे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे. हा अभ्यास बॉडी इमेजमध्ये प्रकाशित झाला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

Porn and Men Health Issues: पुरुषांमध्ये असलेले पोर्नोग्राफीचे व्यसन आणि आरोग्याच्या गंभीर तक्रारी यांचा खूप जवळचा संबंध आहे. जो अधिक चिंताजनक असल्याचे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे. हा अभ्यास बॉडी इमेजमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासत म्हटले आहे की, पोर्नोग्राफीमध्ये गुंतलेल्या पुरुषांमध्ये अनेक शारीरिक समस्या आणि विकार निर्माण होण्याची शक्यता असते. हैफा युनिव्हर्सिटी आणि इस्रायलमधील मॅक्स स्टर्न येझरील व्हॅली कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात 18 ते 68 वयोगटातील 705 पुरुष सहभागी होते. ज्यांचे सरासरी वय 32 वर्षे होते. सहभागींपैकी, अंदाजे 68 टक्के विषमलिंगी म्हणून ओळखले गेले. तर उर्वरित लैंगिक अल्पसंख्याक गटाशी संबंधित असल्याचे ओळखले जाते. (हेही वाचा, Lesbian Partner Detained By Parents Case: लेस्बियन पार्टनरला कुटुंबीयांनी जबरदस्तीने केले विलग, तरुणीची हायकोर्टात याचिका)

सहभागींना त्यांच्या पोर्नोग्राफी आणि खाण्यापीण्याच्या सवयींबाबत विचारण्यात आले. तसेच त्यांना पोर्नोग्राफीच्या वास्तववादाबद्दल आणि त्यांना चिंता आणि/किंवा नैराश्याचा अनुभव आला की नाही याबद्दल देखील विचारले गेले. दरम्यान, प्रश्नांच्या उत्तरांनी दाखवून दिले की, त्यांच्या लैंगिकतेची पर्वा न करता, उच्च पातळीचे पोर्नोग्राफी वापरणारे पुरुष त्यांच्या शरीराची तुलना पॉर्नमध्ये पाहिलेल्या लोकांशी करतात आणि त्यांच्या स्वतःच्या शरीराबद्दल नकारात्मक प्रतिमा ठेवतात. अभ्यासात असेही म्हटले आहे की समस्याग्रस्त पोर्नोग्राफीचा वापर, खाण्याच्या विकाराच्या वर्तणुकीव्यतिरिक्त, एखाद्या व्यक्तीच्या कार्यप्रणाली आणि आरोग्याच्या विविध पैलूंवर नकारात्मक परिणाम करू शकतो.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)