Measles Vaccination Drive: मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत गोवर लसीकरण मोहीम
पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले, 'मुंबई शहरात गोवर या आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने तातडीने बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा.'
मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. हा उपक्रम मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये दिनांक 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले, 'मुंबई शहरात गोवर या आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने तातडीने बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा. लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे करावे. तसेच ज्या बालकांना गोवरची लागण झाली आहे त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार सुरू करावेत,'
Advertisement
संबंधित बातम्या
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Orange Gate–Marine Drive Twin Tunnel Project: मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, मरिन ड्राईव्हला सहा पदरी समांतर सहा पदरी रस्ता, दुहेरी बोगदा प्रकल्पाच काम लवकरच होणार सुरू
Nitin Gadkari On Indian Roads: भारतीय रस्ते दोन वर्षांत अमेरिकेच्या महामार्गांना मागे टाकतील- नितीन गडकरी
Mumbai Coastal Road: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोडवरील हाजी अली ते मरीन ड्राइव्ह इंटरचेंज वाहतुकीसाठी खुला; अंतिम लिंक मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement