'भरपूर मीठ असलेल्या आहारामुळे तणावाची पातळी वाढू शकते'- Study

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जास्त मीठ सेवन केल्याने चिंता आणि आक्रमकता यांसारख्या इतर वर्तणुकीतील बदल होतात का हे समजून घेण्यासाठी पुढील अभ्यास सुरू आहेत.

Salt. (Photo Credits: Pixabay)

भरपूर मीठ असलेल्या आहारामुळे तणावाची पातळी वाढू शकते, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांना उंदरांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की जास्त मीठयुक्त आहारामुळे स्ट्रेस हार्मोनची पातळी 75 टक्क्यांनी वाढते. प्रौढांसाठी शिफारस केलेले मीठ दिवसातून सहा ग्रॅमपेक्षा कमी असते परंतु बहुतेक लोक नियमितपणे नऊ ग्रॅम खातात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जास्त मीठ सेवन केल्याने चिंता आणि आक्रमकता यांसारख्या इतर वर्तणुकीतील बदल होतात का हे समजून घेण्यासाठी पुढील अभ्यास सुरू आहेत. हा अभ्यास कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे. ब्रिटीश हार्ट फाउंडेशन आणि किडनी रिसर्च यूके यांनी याला निधी दिला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)