Chemotherapy Day Care: कर्करोग रूग्णांना खर्चिक उपचारापासून दिलासा; सरकारकडून 34 जिल्ह्यांमध्ये 'केमोथेरपी डे केअर' केंद्राची सुविधा उपलब्ध
त्यामुळे शासनाच्या सुविधांमुळे कर्करोग रूग्णांना उपचार मिळणे सोयीचे होणार आहे.
Chemotherapy Day Care: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढले असून यामध्ये स्तन, गर्भपिशवीच्या मुखाचा तसेच मुख कर्करोग आदीचे प्रमाण लक्षणीय आहे. यावरील उपचार खर्चिक आहेत. रूग्णांना उपचार सुलभ व्हावे यासाठी ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा रूग्णालयात 'केमोथेरपी डे केअर' केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्करोगावरील उपचार महाग असल्यामुळे गरीब, ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेत नाहीत किंवा अर्धवट सोडतात. त्यामुळे शासनाच्या सुविधांमुळे कर्करोग रूग्णांना उपचार मिळणे सोयीचे होणार आहे.
जग ज्या वेगाने प्रगती करत आहे त्यापेक्षा जास्त वेगाने कर्करोगाची प्रकरणे प्लेगप्रमाणे पसरू लागली आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, कर्करोगाची सुमारे अडीच अब्ज प्रकरणे आहेत, त्यापैकी दरवर्षी 96 लाख लोकांचा मृत्यू होत आहे. कर्करोगाच्या बाबतीत भारत पाहिल्याब काही देशांमध्ये आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती आताच कर्करोगाबाबत सजग झाली नाही, तर येणाऱ्या काळात ही अत्यंत स्फोटक परिस्थिती बनेल कारण सध्या भारतात दरवर्षी 8 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. (हेही वाचा: AI च्या माध्यमातून आता स्तनाचा कर्करोग होण्याच्या 5 वर्ष आधीच ओळखता येतो, जाणून घ्या अधिक माहिती)
सरकारकडून 34 जिल्ह्यांमध्ये 'केमोथेरपी डे केअर' केंद्राची सुविधा उपलब्ध-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)