Bird Flu Pandemic: कोरोनापेक्षा 100 पट वाईट असू शकते बर्ड फ्लू महामारी; तज्ञांनी व्यक्त केली चिंता

2003 पासून H5N1 बद्दल जागतिक आरोग्य संघटनेने गोळा केलेला डेटा पाहिल्यास, त्याचा मृत्यू दर हा धक्कादायक 52 टक्के असल्याचा अंदाज आहे.

Chicken (Photo Credits: Pixabay)

Bird Flu Pandemic: कोरोना व्हायरस महामारीच्या भयंकर टप्प्यातून जग अद्याप पूर्णपणे बाहेर आलेले नाही. दरम्यान, आता H5N1 म्हणजेच बर्ड फ्लू महामारीचा प्रसार होण्याची शक्यता आहे, हा आजार कोविड-19 पेक्षाही घातक आहे. H5N1 च्या नवीन स्ट्रेनमुळे विशेषतः गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. व्हाईट हाऊसनेही त्याच्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञ आणि तज्ञ चिंता व्यक्त केली आहे की, बर्ड फ्लू महामारी कोरोनापेक्षा 100 पट वाईट असू शकते. न्यू यॉर्क पोस्टने नोंदवलेले की, यामुळे संक्रमित लोकांपैकी निम्म्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो. 2003 पासून H5N1 बद्दल जागतिक आरोग्य संघटनेने गोळा केलेला डेटा पाहिल्यास, त्याचा मृत्यू दर हा धक्कादायक 52 टक्के असल्याचा अंदाज आहे. याउलट, जर आपण कोविड-19 च्या मृत्यू दराबद्दल बोललो तर तो H5N1 पेक्षा खूपच कमी आहे. 2020 पासूनची अलीकडील प्रकरणे दाखवतात की H5N1 च्या नवीन स्ट्रेनने संक्रमित सुमारे 30 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: Affordable Gene Therapy For Cancer: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील पहिल्या स्वदेशी CAR T-Cell थेरपीची सुरुवात; स्वस्तात होणार कर्करोगावर उपचार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now