Aamras Tops List of World's Best Mango Dishes: जगातील सर्वोत्कृष्ट मँगो डिशेसमध्ये 'आमरस'ने पटकावला पहिला क्रमांक; Taste Atlas ने जारी केली यादी

आमरस व्यतिरिक्त, भारतातील आंब्याची चटणी देखील या यादीत आहे.

Aamras

Aamras Tops List of World's Best Mango Dishes: भारतामध्ये आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. उन्हाळा सुरू झाला की, लोक आंब्याची आतुरतेने वाट पाहू लागतात. गोड आणि रसाळ आंब्याचा वास इतका मोहक असतो की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. एवढेच नाही तर पिकलेल्या आंब्याव्यतिरिक्त लोकांना कच्चा आंबाही खायला आवडतो. आंब्यापासून विविध राज्यांमध्ये अनेक पदार्थ बनवले जातात, मात्र यामध्ये सर्वात लोकप्रिय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील ‘आमरस’. आमरस म्हणजे आंब्याचा गर आणि रस यांच्यापासून बनवलेला ज्यूस. आता आंब्यापासून बनवलेल्या या आमरसने जून 2024 च्या टेस्ट ॲटलसच्या टॉप 10 मँगो डिशमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. आमरस व्यतिरिक्त, भारतातील आंब्याची चटणी देखील या यादीत आहे. या यादीत आंब्याची चटणी पाचव्या स्थानावर आहे. थायलंडच्या स्टिकी मँगो राईस या डिशने द्वितीय तर फिलीपिन्सच्या सरबेटने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif