Shivrajyabhishek Sohala: ‘शिवराज्याभिषेक महोत्सव’ भव्य, अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवण्याचे राज्य सरकारचे आवाहन; जाणून घ्या कुठे कराल मेल
शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत.
पारतंत्र्याच्या अंध:कारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि देशाला घेऊन जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून शिवराज्याभिषेकाचा 350 वा वर्धापनकाळ शिवराज्याभिषेक महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे, त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा जागर करणे, त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे. यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचवावा आणि त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सरकारने min.culture@maharashtra.gov.in या ई-मेलवर सूचना पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला २०२४ यावर्षी ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. सांस्कृतिक विभाग हा वर्धापनकाळ ‘शिवराज्याभिषेक महोत्सव’ म्हणून साजरा करणार आहे. यासंदर्भात सर्वच समाजघटकांनी कल्पक सूचना min.culture@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन मंत्री @SMungantiwar यांनी केले आहे. pic.twitter.com/WQ6o5Frylx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2023 10:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

