Republic Day 2023: आज 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला President Droupadi Murmu करणार देशाला संबोधित, 'या' ठिकाणी पहा भाषणाचे थेट प्रक्षेपण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी 7 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

President Draupadi Murmu (PC - ANI)

गुरुवार, 25 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण देश 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. यंदा इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी हे दिल्लीत कर्तव्य पथवर आयोजित करण्यात येणाऱ्या परेड सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. ते भारतात आले आहेत. आज त्यांचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात स्वागत करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी 7 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी त्यांचे हे पहिले भाषण आहे. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर राष्ट्रपतींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. हे प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये प्रसारित केले जाईल. प्रादेशिक भाषांमध्येही रात्री 9.30 वाजता दूरदर्शनवर ते प्रसारित होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)