Rajmata Jijau Punyatithi 2021: स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ अखंड भारतवर्षाला मातृभूमीच्या रक्षणाचा मंत्र दिला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जिजाऊ माँ साहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आद्यगुरू, शिक्षक, मार्गदर्शक. जिजाऊ माँ साहेब यांच्या त्याग, शौर्य आणि अमोघ मुत्सद्देगिरी यांच्या प्रेरणेतून स्वराज्य साकारले गेले. त्यांनी अखंड भारतवर्षाला मातृभूमीच्या रक्षणाचा मंत्र दिला, अशा शब्दात व्यक्त केल्या भावना.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

'स्वराज्य हे रयतेचेच..!' असे सांगणाऱ्या जिजाऊ माँ साहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आद्यगुरू, शिक्षक, मार्गदर्शक. जिजाऊ माँ साहेब यांच्या त्याग, शौर्य आणि अमोघ मुत्सद्देगिरी यांच्या प्रेरणेतून स्वराज्य साकारले गेले. त्यांनी अखंड भारतवर्षाला मातृभूमीच्या रक्षणाचा मंत्र दिला, मनामनात स्वाभिमान जागविला. या त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.