Pune Ganeshotsav 2024: भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची प्राणप्रतिष्ठा यंदा गायक कैलाश खेर च्या हस्ते संपन्न (Watch Video)
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची प्राणप्रतिष्ठा करून आनंद झालेल्या खेर यांनी सनातन्यांनी एकजूटीने राहून प्रेमाने जगावे असं म्हटलं आहे.
भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची प्राणप्रतिष्ठा यंदा गायक कैलाश खेर च्या हस्ते संपन्न झाली आहे. पुण्यात आज या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 133 वं वर्ष आहे. या बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस 'श्रीखंडी' या पहिल्या ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथकाचे वादन झाले आहे. दरम्यान कैलाश खेर यांनी आपण एखाद्या तीर्थक्षेत्र स्थळी आल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची प्राणप्रतिष्ठा करून आनंद झालेल्या खेर यांनी सनातन्यांनी एकजूटीने राहून प्रेमाने जगावे असं म्हटलं आहे. 'Shikhandi' Dhol Tasha Pathak: पुण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक 'श्रीखंडी' कडून भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या मिरवणूकीमध्ये वादन (Watch Video).
कैलाश खेर यांच्या हस्ते पूजा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)