Happy Narali Purnima HD Images: "सण आयलाय गो, आयलाय गो, नारली पुनव चा, मनी आनंद मावणा, कोळ्यांचे दुनियेचा" कोणी बांधवांचा आवडता सण अखेर आला आहे, आजपासूनच अनेक ठिकाणी सणाची लगबग बगायला मिळत आहे. यावर्षी नारळी पौर्णिमा शुक्रवारी, 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरी केली जाईल. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव वरुण देवाची पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात, समुद्रात होणार्‍या अनुचित घटनेपासून वाचव अशी प्रार्थना करतात. त्यामुळे या सणाचे विशेष महत्व असते. नारळापासून तयार केलेली मिठाई एकमेकांना वाटून आनंद साजरा करतात. नारळी पौर्णिमेला अनेक ठिकाणी लोकगीते गातात आणि लोकनृत्ये सादर करतात. असा हा सण उत्साहात साजरा केला जातो, नारळी पोर्णिमेनंतर पावसाचा जोर ओसरतो आणि मच्छीमार बांधव पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागतात, या सुंदर सणांचे संदेश आम्ही घेऊन आलो आहोत, यंदाच्या नारळी पौर्णिमेनिमित्त खास Wishes, Greetings, Messages, SMS, WhatsApp Status, Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा सण! [हे देखील वाचा: Narali Purnima Special Recipes: नारळी भात ते नारळाचे आप्पे नारळी पौर्णिमेसाठी बनवा खोबर्‍याचे स्वादिष्ट पदार्थ, पाहा व्हिडीओ]

पाहा, HD Images 2022

नारळी-पौर्णिमेच्या-हार्दिक-शुभेच्छा Narali Purnima Images (Photo Credit: File Photo)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)