How To Make Karanji In Diwali 2022: दिवाळीच्या फराळासाठी बनवा खास खुसखुशीत करंजी; 'अशा' प्रकारे तयार करा सारण
दिवाळी म्हटलं की, फराळ तर आलाच. यंदा दिवाळी फराळात करंजी करताना खालील पद्धतीने स्वादिष्ट सारण बनवा.
How To Make Karanji In Diwali 2022: दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळी म्हटलं की, फराळ तर आलाच. करंजी हा एक पारंपारिक महाराष्ट्रीयन स्वादिष्ट नाश्ता आहे, जो सहसा दिवाळीच्या फराळाचा मुख्य भाग असतो. हा कुरकुरीत आणि तळलेला पदार्थ अर्ध्या चंद्रासारखा असतो. त्यात भाजलेले सुवासिक खोबरं, बदाम, मनुके आणि तीळ भरले जातात. करंजा बनवण्यासाठी खालील पद्धत वापरली जाते.
करंजी बनवण्याची पद्धत -
करंजीच्या सारणासाठी सुवासिक खोबरं आणि तीळ तुपात भाजून मिक्स करा. बदाम, काजू, मनुका बारीक करून घ्या. हे मिश्रण नारळ-तीळाच्या मिश्रणात घाला. आवश्यकतेनुसार साखर, चिमूटभर जायफळ पावडर आणि वेलची पावडर घाला. मैदा, तूप, मीठ, दूध वापरून पीठ घट्ट मळून घ्या. यानंतर पिठाचे गोळे 4-5 व्यासाच्या वर्तुळात लाटा. सारण मध्यभागी ठेवा. काठावर थोडेसे पाणी लावा आणि काठाला जोडून घ्या म्हणजे ते अर्ध चंद्रासारखे दिसते. कडांना मुरड घाला आणि सोनेरी होईपर्यंत तळा.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)