Mahaparinirvan Din 2022 Messages: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी मेसेजेस, WhatsApp Status शेअर करून करा अभिवादन
Mahaparinirvan Diwas Messages in Marathi: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. भीमराव आंबेडकरांच्या देशासाठी दिलेल्या महान योगदानाचे स्मरण केले जाते, अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wallpapers, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून करा अभिवादन
Mahaparinirvan Din Messages in Marathi: 6 डिसेंबर 1956 साली दिल्ली येथील राहत्या घरी विश्वरत्त, भारतरत्न, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले होते. सहा डिसेंबरला रात्री भारतरत्न डॉ. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी अखेरचा श्वास घेतला होता. भीमराव आंबेडकरांचे भारताचे संविधान बनवण्यात योगदान अतुलनीय आहे, भारतीय राज्यघटना बनवताना कोणीही लहान-मोठा नसावा आणि संविधानाने देशातील सर्व नागरिकांना एक सामान्य अधिकार दिला पाहिजे, असा आग्रह डॉ.आंबेडकरांनी धरला होता. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. भीमराव आंबेडकरांच्या देशासाठी दिलेल्या महान योगदानाचे स्मरण केले जाते, अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wallpapers, WhatsApp Status, Messages, Quotes, HD Images शेअर करून करा अभिवादन [ हे देखील वाचा: Mahaparinirvan Din 2022 Quotes: महापरिनिर्वाण दिन निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Facebook, WhatsApp द्वारा शेअर करत महामानवाला करा अभिवादन ]
पाहा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर भीम अनुयायी बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन करायला येतात. यंदाही भीम अनुयायींची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बेस्ट प्रशासन, रेल्वे प्रशासन यासाठी विशेष सेवा देखील चालवणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी ट्रेन आणि बसची विशेष सोय असणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)