Lalbaugcha Raja 2024: उद्धव ठाकरे सह कुटुंब पोहचले लालबागच्या राजाच्या दर्शनाला; राजाच्या पहिल्या आरती मध्येही घेतला सहभाग ( Watch Video)
लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहिल्या दिवसांपासून सामान्य भाविकांसोबत सेलिब्रिटी मंडळींची देखील गर्दी पहायला मिळत आहे.
लालबागचा राजा आज विराजमान झाल्यानंतर त्याच्या दर्शनासाठी भाविकांची पहिल्याच दिवसापासून गर्दी पहायला मिळत आहे. राजाच्या पहिल्या आरतीच्या वेळेस आज दुपारी उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत स्थानिक नेते अजय चौधरी देखील उपस्थित होते. आज सकाळी अभिनेता कार्तिक आर्यन देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचला होता.
उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)