Lalbaugcha Raja 2024 Live Streaming Day 1: 'लालबागचा राजा' ची प्राणप्रतिष्ठा संपन्न, दर्शन सुरू; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
लालबागचा राजा यंदा मयुरासनावर विराजमान झाला आहे. यंदा या गणपतीला अंबानी कुटुंबा कडून सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे.
Lalbaugcha Raja 2024 Live Telecast 24X7: मुंबई सह देशभर आजपासून गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवात संपूर्ण वातावरण चैतन्यमय होते. गल्लोगल्ली असलेल्या बाप्पांच्या वेगवेगळ्या रूपाला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. अशामध्ये विशेष आकर्षण आहे ते लालबागच्या राजाचं. यंदा लालबागच्या राजाच्या सार्वजनिक मंडळाचे 91 वे वर्ष आहे. आज पहाटे प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर बाप्पा पुढील 10 दिवसांसाठी भाविकांच्या सेवेमध्ये सज्ज झाला आहे. आज पहिल्याच दिवसापासून मुख दर्शन आणि चरण स्पर्श च्या रांगेसाठी मोठी गर्दी पहायला मिळाली आहे. मंडपामध्ये जाऊ न शकणार्यांना आजपासून पुढील 10 दिवस बाप्पाच्या थेट दर्शनासाठी लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच्या द्वारा बाप्पाचं दर्शन घेतलं जाऊ शकतं. Lalbaugcha Raja 2024: मुकेश अंबानी यांचा मुलगा Anant Ambani ने लालबागच्या राजाला दान केला 20 किलो सोन्याचा मुकूट; जाणून घ्या किंमत (Video).
लालबागचा राजा थेट दर्शन पहिला दिवस
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2024 08:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

