Lalbaugcha Raja 2023 Photo: गणेश चतुर्थीच्या आधी घडले मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन; पहा बाप्पांच्या मूर्तीची पहिली झलक
नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची विशेष ख्याती आहे, त्यामुळेच बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दररोज लाखो भाविक जमतात.
गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी मुंबईसह देशातील प्रसिद्ध लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. आज संध्याकाळी बाप्पांच्या मूर्तीचे दर्शन घडले. ढोल-ताशांच्या गजरात भाविकांनी विघ्नहर्ताचे स्वागत केले. लालबागचा राजा या सार्वजनिक मंडळाला यावर्षी 90 वर्षे पूर्ण होत आहेत.यंदा लालबागच्या राजाच्या दारी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. तर रायगडावरील शिवराज्याभिषेकाचं दर्शन यावेळी लालबागच्या राजाच्या दरबारात होईल. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची विशेष ख्याती आहे, त्यामुळेच बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दररोज लाखो भाविक जमतात, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्सपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांचा सहभाग असतो. (हेही वाचा: Ganeshotsav 2023: GSB Seva Mandal, King's Circle चा यंदा विमा 360 कोटींचा; 66 किलो सोनं, 295 किलो चांदीने मढतो बाप्पा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)