Jai Shree Ram Palkhi: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी उचलली ठाण्याहून अयोध्येकडे जाणारी प्रभू रामाची पालखी, पहा व्हिडिओ (Watch)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाणाऱ्या रामाच्या पालखीला खांदा दिला.
Jai Shree Ram Palkhi: राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पुढील महिन्यात, 22 जानेवारी 2024 रोजी मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन होईल. अशात देशभरातून भाविक पालख्या घेऊन अयोध्येकडे रवाना झाले आहेत. याआधी महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर येथून 300 राम भक्तांचा जथ्था रविवारी अयोध्येसाठी रवाना झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व रामभक्तांना त्यांच्या पदयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता आज भगवान रामाची पालखी ठाण्याहून रामाची नगरी अयोध्येकडे निघाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाणाऱ्या रामाची पालखी उचलली. या पालखीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सीएम शिंदे खांद्यावर पालखी घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. (हेही वाचा: Special Trains for Ayodhya Ram Mandir: राममंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे 19 जानेवारीपासून चालवणार 1,000 स्पेशल गाड्या)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)