Hutatma Smruti Din 2023: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन निमित्त CM Eknath Shinde ते Sanjay Raut यांच्याकडून हुतात्म्यांंना आदरांजली!

राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2000 पासून हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली.

Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून मुंबई सह महाराष्ट्र राज्य अस्तित्त्वात आले. पण पुढे हे बलिदान विस्मरणात जाऊ नये म्हणून महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांच्या मागणीवरून राज्य सरकारने 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली या दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या 107 जणांचे आदराने स्मरण केले जाते. आजच्या या महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते संजय राऊत यांनी हुतात्म्यांप्रति आदरांजली अर्पण केली आहे. नक्की वाचा:  स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये या '107' हुतात्मांनी दिले होते बलिदान!

 महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उप्मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संजय राऊत

लातूर पोलिस