Diwali 2023: केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सजावट; पहा नजारा (Video)

12 नोव्हेंबर दिवशी नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन साजरी केली जाणार आहे. हा दिवाळी सणातील मोठा दिवस आहे.

Kedarnath | Twitter

केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सध्या उत्तराखंड मध्ये बर्फ कोसळत आहे. या मंदिरांच्या आसपासच्या भागातही बर्फ पडला आहे. पण दिवाळी सेलिब्रेशनसाठी सध्या झेंडूच्या फुलांनी हा भाग सजवण्यात आला आहे. केदारनाथ आणि यमुनोत्री धामचे दरवाजे 15 नोव्हेंबरला बंद होतील, तर गंगोत्री धामचे दरवाजे 14 नोव्हेंबरला आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 18 नोव्हेंबरला बंद होतील. चारधामचे दरवाजे बंद झाल्याने यात्रा सहा महिने बंद राहणार आहे. Ayodhya Deepotsav 2023: अयोद्धा नगरी दीपोत्सवामध्ये 51 घाट 24लाख दिव्यांनी झगमगणार; Guinness World Record ची उत्सुकता .

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now