Dahi Handi 2024: 'एका रात्रीत सरकार बदलू शकतं मग बलात्कार्याला फाशी का नाही?' वरळी च्या जांभोरी मैदानात चिमुकल्या गोविंदाच्या पाटीने वेधलं लक्ष (Watch Video)
बदलापूर नंतर राज्यात अनेक ठिकणी महिलांसोबतच लहान मुलींवर देखील अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
वरळीच्या जांभोरी मैदानात आज हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. यामध्ये एका बाळ गोपाळाच्या हातात असल्याने पाटीने अनेकंचे लक्ष वेधले आहे. बलात्कार पीडीतांना न्याय मिळवून देण्याचा संदेश त्यावर आहे. जर सरकार एका रात्रीत बदलतं, नोटबंदी एका रात्रीत होते, मग महिलांवर बलात्कार करणार्यांना एका रात्रीत फासावर चढवलं जाऊ शकतं नाही? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. नक्की वाचा: Dahi Handi 2024: मुंबईच्या दादरमध्ये महिला गोविंदांनी मानवी पिरॅमिड बनवून 'मटकी' फोडली (पहा व्हिडिओ).
जांभोरी मैदानात चिमुकला गोविंदा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)