Ayodhya Deepotsav 2023 Live Streaming: लक्ष लक्ष दिव्यांनी आज उजळणार अयोद्धा नगरी; इथे पहा थेट प्रक्षेपण

यूपी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये झारखंड मधील ग्रामीण भागातील नागरिकांच्या हस्ते यंदा दीपोत्सवातील दिवे लावले जाणार आहेत.

Ayodhya's Ram Mandir (Photo Credits: PTI)

अयोद्धेचा दीपोत्सव यंदा ऐतिहासिक होणार आहे. हिंदू मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम 12 वर्षांचा वनवास संपवून सीता मातेला घेऊन अयोद्धेमध्ये आले होते. त्यांच्या स्वागताला दिव्यांची आरास करण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला अयोद्धेमध्ये दिवे प्रज्वलित करण्याची रीत आहे. 'अयोद्धा दीपोत्सव' म्हणून सोहळा साजरा केला जातो आणि तो अनुभवण्यासाठी देशा-परदेशातून लोकं अयोद्धेला येतात. यंदा तुम्हांला अयोद्धेमध्ये जाणं शक्य नसेल तर या सोहळ्याचे क्षण थेट पाहू शकाल आज दुपारी 3 वाजल्यापासून दिवे प्र्ज्वलित करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 24 लाख दिव्यांनी 51 घाटांचा परिसर झगमगणार आहे. Ayodhya Deepotsav 2023: अयोद्धा नगरी दीपोत्सवामध्ये 51 घाट 24लाख दिव्यांनी झगमगणार; Guinness World Record ची उत्सुकता .

पहा Ayodhya Deepotsav 2023 Live Streaming

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now