Ashadhi Ekadashi 2022: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला सातारा प्रशासनाने दिला निरोप (Watch Video)

21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीहून प्रस्थान झाले होते.

File Photo Of Sant Dyaneshwar Palkhi (Photo Credits: Wiki Commons)

अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे, अशात आता राज्यातून निघालेल्या पालख्यांना पंढरपूरची ओढ लागली आहे. तब्बल 2 वर्षानंतर आषाढी वारी होत असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीहून प्रस्थान झाले होते. गेले तीन दिवस पालखी सातारा जिल्ह्यात होती. आता आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला सातारा प्रशासनाने निरोप दिला. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोमवार 4 जुलै रोजी दुपारी 11 वाजून 45 मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे आगमन झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement