Akshaya Tritiya 2022: केवळ सोनेच नाही तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘या' वस्तू घरात आणल्यास संपत्तीमध्ये होते वाढ, जाणून घ्या

असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात, शुभ परिणाम देतात आणि त्यामध्ये वाढ होते. यावर्षी ३ मे रोजी अक्षय्य तृतीया आहे.

अक्षय्य तृतीया हा शुभ दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. अक्षय्य तृतीया हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयाला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात, शुभ परिणाम देतात आणि त्यामध्ये वाढ होते. यावर्षी ३ मे रोजी अक्षय्य तृतीया आहे.

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ असते परंतु सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सर्वांनाच सोने खरेदी करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत, तर काही इतर गोष्टी देखील आहेत ज्या खरेदी केल्याने आणि घरात आणल्याने सुख-समृद्धी नांदते. या गोष्टींमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचाही आशीर्वाद मिळतो.पाहा कोणत्या आहेत त्या वस्तू

दक्षिणावर्ती शंख:

दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हे घरात ठेवल्याने घरात नेहमी सुख-समृद्धी येते. विधिवत पूजास्थळी दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करा. लक्षात ठेवा पूजेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त शंख ठेवू नये.

जव :

शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला जव खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखेच शुभ मानले जाते. हे जव भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा. नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तुमच्या घरात असलेल्या धन-संपत्तीमध्ये वाढ होईल.

कवड्या :

कवड्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. अक्षय्य तृतीयेला कवड्या विकत घेऊन देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. आस्थेने देवी लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात गुंडाळून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. धन संपत्ती वाढेल.

श्रीयंत्र :

अक्षय्य तृतीयेला श्री यंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी विधिपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी. श्रीयंत्र घरात आणल्यास समृद्धी घरात नांदते.

घागर:

अक्षय्य तृतीयेला घागरी खरेदी करणेही खूप शुभ आहे. घागरी विकत घेऊन घरात ठेवणे आणि त्यात सरबत भरून त्याचे दान करणे हेही शुभ आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)