Malharrao Holkar Jayanti 2024: इंदौर संस्थानाचे संस्थापक, सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार, छगन भूजबळ, बाळासाहेब थोरात, अमित देखमुख आदी नेत्यांनी सोशल मीडियावर वाहिली विनम्र आदरांजली!
आज मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भूजबळ, बाळासाहेब थोरात, अमित देखमुख आदी नेत्यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं आहे.
Malharrao Holkar Jayanti 2024: इंदौर संस्थानाचे संस्थापक, सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती (Malharrao Holkar Jayanti 2024) सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मल्हारराव होळकर हे होळकर घराण्याचे संस्थापक होते.मल्हारराव होळकर यांचा जन्म 16 मार्च 1693 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळील होळ गावात एका धनगर कुटुंबात खंडूजी होळकर यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील 1696 मध्ये मरण पावले, तेव्हा ते फक्त तीन वर्षांचे होते. ते मल्हार राव तळोदा (नंदुरबार जिल्हा, महाराष्ट्र) येथे त्यांचे मामा सरदार भोजराजराव बारगळ यांच्या वाड्यात वाढले. आज मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भूजबळ, बाळासाहेब थोरात, अमित देखमुख आदी नेत्यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)