Tukaram Beej 2025: संत तुकाराम महाराजांचा 376 वा बीज सोहळा देहूमध्ये उत्साहात साजरा; पहा व्हिडिओ

महाराष्ट्रातील वारकरी तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी करतात. हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे.

Tukaram Beej 2025 (फोटो सौजन्य -X/@iamShantanu_D)

Tukaram Beej 2025: आज तुकाराम बीज अर्थात जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांचा 376 वा सदेह वैकुंठ गमन सोहळा देहुमध्ये उत्साहात पार पडत आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी तुकाराम महाराजांच्या भक्तीत आकंठ बुडालेले दिसत आहेत. तुकाराम बीज (Tukaram Beej 2025) हा संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिवस मानला जातो. महाराष्ट्रातील वारकरी तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी करतात. हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement