24th Kargil Vijay Diwas: द्रास येथे लष्कराकडून 'कारगिल विजय दिवसा'ची जोरात तयारी सुरु; जाणून घ्या Kargil War Memorial बाबत खास माहिती (Watch Video)
भारतात दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस हा दिवस युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
‘कारगिल विजय दिवस’ हा स्वतंत्र भारतातील सर्व देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारगिल युद्ध, ज्याला ऑपरेशन विजय असेही म्हणतात, हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सशस्त्र संघर्षाचे नाव आहे. हे युद्ध काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात मे ते जुलै 1999 दरम्यान झाले. सुमारे 60 दिवस चाललेले हे युद्ध 26 जुलै रोजी संपले, ज्यामध्ये भारताचा विजय झाला. हा दिवस भारतात दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस हा दिवस युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यंदा भारताने 1999च्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवून 24 वर्षे पूर्ण होत आहेत.
आता द्रास येथील कारगिल युद्ध स्मारक येथे होणाऱ्या कारगिल विजय दिवसाच्या सोहळ्यासाठी लष्कर सज्ज झाले आहे. अनेक सेवानिवृत्त आणि लष्करी कर्मचारी, कारगिल युद्धातील दिग्गज आणि शहीद झालेल्या वीरांचे निकटवर्तीय या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ठिकाणी कारगिल विजय दिवसाची तयारी जोरात सुरू आहे. अशात रायफलमॅन अमित सिंग यांनी कारगिल स्मारकाबाबत माहिती दिली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ही माहिती ऐकू शकता. (हेही वाचा: भारतीय सैन्याद्वारे 24व्या कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ नवी दिल्ली ते द्रास दरम्यान तिन्ही दलातील सर्व महिलांच्या मोटरसायकल रॅलीचे आयोजन)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)