IPL Auction 2025 Live

DJ Music Haram In Islam: ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमध्ये डीजे संगीत, नृत्य आणि फटाके यावर बंदी

"पवित्र पैगंबरांचा जन्मदिवस शालीनतेने साजरा केला गेला पाहिजे आणि डीजे संगीत, नाचणे आणि फटाके फोडणे या गैर-इस्लामिक प्रथा आहेत.

Eid e Milad un Nabi Mubarak WhatsApp DP And Wallpaper (Photo Credits: File Image)

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमध्ये डीजे संगीत, नृत्य आणि फटाके यांना "हराम" किंवा निषिद्ध असे संबोधत, वरिष्ठ मौलवींच्या गटाने मुस्लिमांना पैगंबर मुहम्मद यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांचा वापर करू नये असे सांगितले आहे. पैगंबरांचा जन्मदिवस किंवा ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबरला असला तरी गणेश विसर्जनाचा शेवटचा दिवसही 28 सप्टेंबरला असल्याने कोणताही त्रास होऊ नये म्हणून 29 सप्टेंबरला मिरवणूक काढण्यात येणार आहे. "पवित्र पैगंबरांचा जन्मदिवस शालीनतेने साजरा केला गेला पाहिजे आणि डीजे संगीत, नाचणे आणि फटाके फोडणे या गैर-इस्लामिक प्रथा आहेत. खरे तर ते 'हराम' किंवा निषिद्ध आहे आणि मुस्लिमांनी साजरा केल्यास ते पाप होईल. असे ज्येष्ठ मौलवी, उपदेशक आणि ऑल इंडिया सुन्नी जमीतुल उलेमाचे अध्यक्ष मौलाना मोईन अश्रफ कादरी (मोईन मियां) म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)