Anant Ambani and Radhika Merchant Wedding Date and Event Schedule: मुंबई च्या Jio World Convention Centre मध्ये पार पडणार अनंत-राधिका चा शाही विवाहसोहळा; पहा 12-14 जुलै दरम्यानच्या त्यांच्या लग्न विधींची आमंत्रण पत्रिका!

मुंबईच्या बीकेसीत Jio World Convention Centre मध्ये अनंत आणि राधिकाचं लग्न 12 जुलै दिवशी पार पडणार आहे.

Anant Ambani, Radhika Merchant (PC - Twitter/@mpparimal)

नीता आणि मुकेश  अंबानी  यांच्या कुटुंबातील  शेंडेफळ अनंत अंबानीचा विवाह सोहळा 12 जुलै दिवशी होणार आहे. या लग्न सोहळ्याची सध्या परदेशात दुसरी प्री वेडिंग पार्टी सुरू असताना आज (30 मे) त्यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. यामध्ये मुंबईच्या बीकेसीत Jio World Convention Centre मध्ये हे लग्न 12 जुलै दिवशी पार पडणार आहे. 12 जुलै दिवशी मुख्य लग्न सोहळा आणि 14 जुलै दिवशी रिसेप्शन पार पडणार आहे.या सोहळ्याला देखील देशा- परदेशातील मान्यवर हजर राहण्याची शक्यता आहे. Anant Ambani-Radhika Merchant 2nd Pre-Wedding Bash: इटली-फ्रान्स मध्ये राधिका-अनंतच्या प्री वेडिंग क्रुझ पार्टीचं 29 मे ते 1 जून दरम्यान 'असं' आहे नियोजन! 

Anant Ambani and Radhika Merchant लग्नपत्रिका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)