Life-Saving Moment: चालत्या बसमधून तरुणाचा तोल गेला, कंडक्टरने वाचवला प्रवाशाचा जीव (Watch Video)

प्रसंगवधान साधत कंटक्टरने एका तरुणाचा जीव वाचवला आहे.

keral Video PC TWITTER

Life-Saving Moment: केरळमध्ये (Keral) एका चालत्या बसमध्ये मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली आहे. प्रसंगवधान साधत धाडसी कंटक्टरने एका तरुणाचा जीव वाचवला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओत (Video) दिसल्याप्रमाणे, तरुण बसच्या दरवाजापासून काही अंंतरावर उभा होता. चालत्या बसमध्ये अचानक ब्रेक मारताच तरुणाचा तोल गेला. तेवढ्यात कंडक्टरने तरुणाचा हात पकडला आणि त्याला खाली पडण्यापासून वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर कंडक्टरचे सर्वींकडे कौतुक होत आहे. (हेही वाचा- लोकल ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपीला मालाड रेल्वे स्थानकावरून अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)