Wrestlers Protest: मेडल गंगेत फेकण्याचा कुस्तीपटुंचा इशारा, दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलक आक्रमक

भाजपा खासदार आणि भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी काही महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जातोय.

Wrestlers Protest

भारतीय कुस्तीपटूंविरोधात रविवारी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या आणि नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या या कुस्तीपटूंची धरपकड करण्यात आली. तसंच, ताब्यात घेतल्यानंतर या कुस्तीपटूंविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. या कारवाईनंतर कुस्तीपटू नाराज झाले असून त्यांनी आज संध्याकाळी आपल्याला मिळालेले सर्व मेडल हरिद्वार येथे गंगेत फेकण्याचा इशारा दिला आहे.

भाजपा खासदार आणि भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी काही महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जातोय. याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कुस्तीपटूंनी गेल्या महिन्याभरापासून जंतरमंतरवर आंदोलन पुकारले आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement