Parag Desai Passed Away: कुत्र्याच्या हल्ल्यात उद्योजक पराग देसाई यांचा मृत्यू, रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास
उद्योग क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्याचा हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेले पराग देसाई यांचे निधन झाले आहे.
Parag Desai Passed Away: उद्योग क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्याचा हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेले पराग देसाई यांचे निधन झाले आहे. पराग देसाई हे वाघ बकरी चहा (Wagh Bakari Tea) समूहाचे कार्यकारी संचालक होते. रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास सोडला. या घटनेमुळे उद्योगक्षेत्रात शोककला पसरली आहे. 15 ऑक्टोबर रोजी ते सकाळी वॉकिंगला निघाले असताना, रस्त्यात त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा पाय घरला आणि डोक्यावर मार लागला. भरपूर रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आले. उपचारात त्यांच्यात काहीच सुधारणा झाल्या नाहीत. आज सकाळी त्यानी अहमदाबाद येथील रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. उद्योग क्षेत्रात पराग यांच मोठं नाव होते. व्यवसायाचा वारसा चालवणारे ते चौथी पिढी होती. वाघबकरी ब्रँड जगभरात पोहोचवण्यात पराग यांच मोठी कामगिरी होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)