Car Drowned: गोदावरी येथे मोठी दुर्घटना, कालव्यात कार पडल्याने सहा जण बुडाले (Watch Video)

पाण्यात बुडलेल्याचा शोध सुरु आहे.

Car drown PC twitter

Car Drowned: आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी येथील बुरुगुपुडी गावाजवळ रविवारी पहाटे सहा जणांसह एक कार कालव्यात पडली. या संदर्भात आणखी कोणतीही माहिती समोर आली नाही. PTI ने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. पोलीस घटनास्थळी  दाखल झाले आहे. पुढील तपासणी सुरु केली आहे. बचाबपथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काम सुरु केले आहे. ही कार कुठून आली आहे आणि कोणत्या गावतील रहिवासी पाण्यात बुडाले आहे या संदर्भात कोणतीही माहिती अद्यापही आली नाही. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच धाव घेतला आहे. पाण्यात बुडलेले प्रवाशी यांना मदतीसाठी स्थानिकांचे प्रयत्न चालू आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)