Swati Maliwal Assault Case: विभव कुमार मुख्यमंत्री निवासस्थानातून ताब्यात; स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ल्याचा आरोप

स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. स्वाती मालीवाल यांनीही याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

DCW Swati Maliwal (PC - Facebook)

Swati Maliwal Assault Case: 'आप'च्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आताची मोठी बातमी समोर येत आहे. काही वेळापूर्वी दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी विभव कुमार (Vibhav Kumar) ला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. स्वाती मालीवाल यांनीही याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआर दाखल झाल्यापासून दिल्ली पोलिस विभव कुमारचा शोध घेत होते. दिल्ली पोलिसांना एसएचओ सिव्हिल लाइन्स आणि अतिरिक्त डीसीपी नॉर्थ सीएम हाऊसमध्ये पोहोचल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांचा ताफा सीएम हाऊसवर पोहोचला. (हेही वाचा - Swati Maliwal Assault Case: पोलिसांनी स्वाती मालीवालच्या मदतीने रिक्रिएट केला 13 मे चा सीन (Watch Video))

ANI ट्विट -

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement