Vande Bharat Accident: वंदे भारत ट्रेनला पुन्हा गुरे धडकली, जीवित वा वित्तहानी नाही, चौथी घटना (Watch Video)

माहितीनुसार, या धडकेमुळे ट्रेनच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. 12 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ट्रेन तिकडे थांबली.

Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेन गुरुवारी पुन्हा एकदा अपघाताची शिकार झाली आहे. गुजरातमधील उदवाडा आणि वापी स्थानकांदरम्यान गुरुवारी संध्याकाळी गांधीनगर-मुंबई वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला गुरे धडकली आहे. माहितीनुसार, या धडकेमुळे ट्रेनच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. 12 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ट्रेन तिकडे थांबली. दोन महिन्यांपूर्वी काम सुरू झाल्यापासून या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेनला जनावरे धडकण्याची ही चौथी घटना आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement