15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु होणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदीं (PM Narendra Modi) यांनी शनिवारी राष्ट्राला संबोधित केले. आज संपूर्ण जगात ओमिक्रोचा संसर्ग वाढत आहे.

Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदीं (PM Narendra Modi) यांनी शनिवारी राष्ट्राला संबोधित केले. आज संपूर्ण जगात ओमिक्रोचा संसर्ग वाढत आहे. यावेळी घाबरू नका, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींनी 3 मोठ्या घोषणा केल्या आहे.

1. देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू होणार आहे. 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

2. आरोग्य कर्मचार्‍यांसाठी, 10 जानेवारी 2022 पासून पूर्व-प्रतिबंध डोस (बूस्टर डोस) सुरू होईल.

3. 60 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लोकांसाठी, पूर्व-प्रतिबंध डोस (बूस्टर डोस) देखील सादर केले जातील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement