Uttar Pradesh Accident: बरेली-नैनिताल महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक लागल्याने भीषण आग,घटनेत ८ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील बरेली येथील भोजीपुरा भागात नैनिताल महामार्गावर भीषण अपघात झाला. भोजीपुरा पोलिस ठाण्याजवळ शनिवारी रात्री हा अपघात झाला.
UP Accident: उत्तर प्रदेशातील बरेली येथील भोजीपुरा भागात नैनिताल महामार्गावर भीषण अपघात झाला. भोजीपुरा पोलिस ठाण्याजवळ शनिवारी रात्री हा अपघात झाला. कारची ट्रकला धडकल्यानंतर कारला भीषण आग लागली, या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. मृत झालेल्यांपैकी लहान मुलाचा समावेश होता. कारमधील प्रवाशी बरेली शहारातील एका लग्न समारंभातून घरी जात होते. दरम्यान रात्रीच्या वेळीस ट्रक आणि कारची धडक झाली आणि आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. आग विझवून कारमधून मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत कार आणि ट्रक पुर्णपणे जळून खाक झाले आहे. आग लागताच कारमधील प्रवाशी बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते पंरतु कारमधील सेट्रंल लॉक जाम झाल्याने प्रवाशी बाहेर पडू शकले नाही. या भीषण आगीचा व्हिडिओ समोर आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)