Telangana Accident: सिध्दीपेट जिल्ह्यात अनियंत्रित कारचा अपघात, चार जखमी; घटनेचा Video आला समोर,
तेलंगणातील सिध्दीपेट जिल्ह्यात महामार्गावर एक भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.
Telangana Accident: तेलंगणातील सिध्दीपेट जिल्ह्यात महामार्गावर एक भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी घडली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, सिध्दीपेट येथील कुकुनूर पल्ली येथे राजीव महामार्गावर एका भरधाव कारचे नियत्रंण सुटले आणि कार डिव्हाडरला धडकली. त्यानंतर ती रस्त्याच्या विरुध्द दिशेने धडकली. ( हेही वाचा- ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग, जबलपूर मधील घटना)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)