Arunachal Pradesh Earthquake : अरुणाचल प्रदेशमध्ये दोन तासात दोन भूकंप; 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

अरुणाचल प्रदेशमध्ये गुरुवारची पहाट भूकंपांच्या धक्यांनी झाली. एकामागोमाग दोन भुकंपाचे धक्के नागरिकांना जाणवले. 3.4 रिश्टर स्केल एवढी भुकंपाच्या धक्क्यांची तीव्रता नोंदवली गेली.

Earthquake

Arunachal Pradesh Earthquake : पहिला भूकंपाची तीव्रता 3.7 होती, मध्यरात्री 1:49 वाजता पहिला भूकंप (Earthquake ) नागरिकांनी अनुभवला. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 27.38 आणि रेखांश 92.77 10 किलोमीटर खोलीवर होता. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग भूकंपाचे केंद्रबिंदू होते. दोन तासांनी दुसरा भूकंप 3:40 जाणवला. भूकंपाची तीव्रता 3.4 होती. पूर्व कामेंग(East Kameng) भूकंपाचे केंद्रबिंदू होते. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 27.46 आणि रेखांश 92.82 होता. 5 किलोमीटर खोलीवर होता. (हेही वाचा: Marathwada Earthquake: नांदेड, परभणी, हिंगोली मध्ये पहाटे 4.2 रिश्टल स्केलचा भूकंप; दोनदा हादरलं हिंगोली!)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement