Sattur Firecracker Factory Blast: तमिळनाडूत एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, तीन जणांचा मृत्यू

तमिळनाडू येथील विरुधुनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. विरुधुनगर येथील सत्तूजवर एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

Explosion in Factory Tamilnadu PC ANI

Sattur Firecracker Factory Blast:  तमिळनाडू येथील विरुधुनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. विरुधुनगर येथील सत्तूजवर एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले आहे. जखमीला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच, बचावकार्य घटनास्थळी सुरु झाले. अग्निशमन दलाच्या जवांनानी बचाव कार्य सुरु केले. (हेही वाचा-  दिल्ली तुंबली, 2 महिन्यांसाठी अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द, नियंत्रण कक्ष करणार तयार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now