UP Shocker: उत्तर प्रदेशमध्ये चोरट्यांची दहशत कायम; कानपूरमध्ये चोरट्यांनी भरदिवसा महिलेला रस्त्यात अडवून चोरली सोनसाखळी, Watch Video
उत्तर प्रदेशमध्ये चोरट्यांची दहशत थांबवायचं नाव घेत नाहीये. कानपूरमध्ये चोरट्यांनी एका महिलेला वाटेत अडवून तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचली. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
UP Shocker: उत्तर प्रदेशात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कानपूरमध्ये घडली असून जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओमध्ये, दोन दुचाकीस्वार पुरुष एका स्कूटरस्वार महिलेला अडवतात. असे दिसते की, ते गल्लीत यू-टर्न घेण्यासाठी थांबले आहेत. दुचाकीस्वार दुचाकीवरून उतरतो आणि विचलित झालेल्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून घेतो. एका महिलेने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्याने दोघे दुचाकीवरून पळून गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)