Scooty Riding Girl Landed on Pillar: अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे तरुणी स्कुटीसह पुलाच्या पिलरवर पडली, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर २५ जवळ एक भीषण अपघात झाला आहे. स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणीला एका अज्ञात वाहनांची धडक लागली. या धडकेत तरुणी उंच पुलाच्या खांबावर पडली.

Up Accident PC TW

Scooty Riding Girl Landed on Pillar: उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 25 जवळ एक भीषण अपघात झाला आहे. स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणीला एका अज्ञात वाहनांची धडक लागली. या धडकेत तरुणी उंच पुलाच्या खांबावर पडली. ही घटना नोएडा सेक्टर 20 पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली जेव्हा मुलगी तिच्या स्कूटरवरून जात होती आणि अचानक तिला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेमुळे तिचा तोल गेला आणि ती थेट पुलाच्या पिलरवर पडली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी स्थानिकांनी तरुणीच्या मदतीसाठी धाव घेतला आहे.  दोन जणांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिकाही पाचारण करण्यात आली आहे. सध्या मुलीच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.  (हेही वाचा- बुधवार पेठेतील पोस्ट ऑफिसच्या आवारात रस्त्याला भगदाड; पुणे महानगरपालिकेचा ट्रकचं गेला खड्ड्यात, पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ)

नोएडा येथील व्हिडिओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now