Scooty Riding Girl Landed on Pillar: अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे तरुणी स्कुटीसह पुलाच्या पिलरवर पडली, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर २५ जवळ एक भीषण अपघात झाला आहे. स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणीला एका अज्ञात वाहनांची धडक लागली. या धडकेत तरुणी उंच पुलाच्या खांबावर पडली.
Scooty Riding Girl Landed on Pillar: उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 25 जवळ एक भीषण अपघात झाला आहे. स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणीला एका अज्ञात वाहनांची धडक लागली. या धडकेत तरुणी उंच पुलाच्या खांबावर पडली. ही घटना नोएडा सेक्टर 20 पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली जेव्हा मुलगी तिच्या स्कूटरवरून जात होती आणि अचानक तिला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेमुळे तिचा तोल गेला आणि ती थेट पुलाच्या पिलरवर पडली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी स्थानिकांनी तरुणीच्या मदतीसाठी धाव घेतला आहे. दोन जणांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिकाही पाचारण करण्यात आली आहे. सध्या मुलीच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा- बुधवार पेठेतील पोस्ट ऑफिसच्या आवारात रस्त्याला भगदाड; पुणे महानगरपालिकेचा ट्रकचं गेला खड्ड्यात, पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ)
नोएडा येथील व्हिडिओ
#WATCH | Uttar Pradesh: A scooty-riding girl landed on the pillar of the elevated road near Noida Sector 25 under Sector 20 PS area, after she was hit by an unidentified vehicle. Two men are attempting to rescue her. More details awaited. pic.twitter.com/IsABJQrH1t
— ANI (@ANI) September 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2024 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

